SWAMIMARG.ONLINE
दैनिक राशीभविष्य: ०७ मार्च २०२६
॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ जय शनिदेव ॥
आज प्रलंबित कामे पूर्ण होतील. कोर्टाच्या कामात यश मिळेल. मेहनतीचे योग्य फळ मिळल्याने मन समाधानी राहील.
आर्थिक व्यवहारात सावध राहा. कुटुंबात छोटे मतभेद होण्याची शक्यता आहे. वाणीवर ताबा ठेवणे हितकारक ठरेल.
मित्र-परिवाराचे सहकार्य लाभेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्यात सुधारणा होईल.
मानसिक तणाव कमी होईल.चतुर्थी असल्यामुळे बाप्पाच्या कृपेने विघ्न दूर होतील. आर्थिक प्रगती होईल.
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आज घरातील थोरांचे आशीर्वाद घेतल्यास कठीण कामे सोपी होतील. प्रवास लाभदायक ठरेल.
आज खर्चात वाढ होईल. बोलण्यामुळे कोणाचे मन दुखवू नका. संयम ठेवल्यास कठीण परिस्थितीवर मात कराल.
आजचा दिवस आनंदाचा राहील. प्रेमात यश मिळेल. रखडलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे.
कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. आज जुन्या आजारातून सुटका मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
भाग्याची साथ लाभेल. परदेश प्रवासाचे योग आहेत. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. आर्थिक आवक वाढेल.
आरोग्याची काळजी घ्या. आज वाहने सावधगिरीने चालवा. कष्टाच्या जोरावर आज कठीण ध्येय गाठाल.
वैवाहिक जीवनात सुखद अनुभव येतील. नवीन भागीदारी यशस्वी होईल. मान-सन्मानात वाढ होईल.
आज विरोधकांवर मात कराल. नोकरीत बढतीचे योग आहेत. घरातील मोठ्यांचा सल्ला आज फायदेशीर ठरेल.


0 टिप्पण्या