SWAMIMARG.ONLINE
दैनिक राशीभविष्य: १७ मार्च २०२६
॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ जय बजरंगबली ॥
♈ मेष
आज कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील. जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
♉ वृषभ
व्यवसायात नवीन संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
♊ मिथुन
आज नशिबाची साथ थोडी कमी मिळेल. कामात अडथळे येऊ शकतात. प्रवासात सावध राहा. स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा.
♋ कर्क
आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. अध्यात्माकडे कल वाढेल.
♌ सिंह
वैवाहिक जीवनात गोडवा राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आत्मविश्वास वाढेल.
♍ कन्या
आज गुप्त शत्रूंकडून त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र, तुमच्या चिकाटीने तुम्ही यश मिळवाल. मामाकडून लाभ होईल. कर्ज प्रकरणे सुटतील.
♎ तुला
मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न होईल. अचानक धनलाभाचे योग आहेत. शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करा. मित्र भेटतील.
♏ वृश्चिक
मालमत्तेचे प्रश्न सुटतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. घरात नवीन वस्तूंची खरेदी होईल. कामाच्या ठिकाणी बदल शक्य आहे.
♐ धनु
तुमचा पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. लहान सहलीचे बेत ठरतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. मान-सन्मान मिळेल.
♑ मकर
आर्थिक बाजू भक्कम होईल. जुने येणे वसूल होईल. कुटुंबात मांगलिक कार्याची चर्चा होईल. वाणीवर नियंत्रण ठेवा, वाद टाळा.
♒ कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी आहे. तुमची कार्यक्षमता वाढेल. प्रलंबित निर्णय आज घ्यावेत. मनासारखी खरेदी होईल.
♓ मीन
खर्चाचे प्रमाण वाढेल. डोळ्यांचे विकार जाणवू शकतात. परदेशातील कामात प्रगती होईल. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान धारणा करा.


0 टिप्पण्या