॥ श्री स्वामी समर्थ ॥
साप्ताहिक राशीभविष्य
२२ मार्च ते २८ मार्च २०२६
♈ मेष
या आठवड्यात तुम्हाला आत्मविश्वासाने भरलेले वाटेल. नवीन व्यावसायिक करार पूर्ण होतील. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
♉ वृषभ
आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे. प्रलंबित धनप्राप्ती होईल. सरकारी कामात यश मिळेल. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील.
♊ मिथुन
विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा आहे. करिअरमध्ये महत्त्वाचे बदल होतील. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा.
♋ कर्क
भावनिक निर्णय घेताना सावध राहा. मालमत्तेचे व्यवहार पूर्ण होतील. मित्रांकडून अपेक्षित मदत मिळेल. घराच्या नूतनीकरणाचे बेत ठरतील.
♌ सिंह
तुमच्या कर्तृत्वाचा गौरव होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. राजकारणातील लोकांना मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान मिळेल.
♍ कन्या
व्यापारात नवीन संधी चालून येतील. संवादातून अवघड प्रश्न सुटतील. मात्र, गुप्त शत्रूंपासून सावध राहा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका.
♎ तुला
आर्थिक नियोजन यशस्वी होईल. जोडीदारासोबत प्रवासाचे योग आहेत. कलेच्या क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. आरोग्यात सुधारणा जाणवेल.
♏ वृश्चिक
धाडसी निर्णय घेण्यासाठी काळ अनुकूल आहे. कष्टाचे फळ मिळेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल.
♐ धनु
सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभेल. घरात आनंदाची बातमी येईल. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा.
♑ मकर
साडेसातीचा काळ असला तरी स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. संयम राखा. मोठ्या व्यवहारात घाई करू नका. कामाच्या ठिकाणी बदल शक्य आहे.
♒ कुंभ
तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. नवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड निर्माण होईल. भांवडांकडून सहकार्य लाभेल. प्रवासात सावध राहा.
♓ मीन
सूर्य तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वासात वाढ होईल. मानसन्मान मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे बचत करण्याकडे कल ठेवा.


0 टिप्पण्या