📿 दैनिक राशीभविष्य — १६ मे २०२६, शनिवार ⚖️

दैनिक राशीभविष्य — १६ मे २०२६, शनिवार | स्वामी मार्ग

WWW.SWAMIMARG.ONLINE

दैनिक राशीभविष्य: १६ मे २०२६

॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ जय शनिदेव ॥

शनिवार | वैशाख कृष्ण अमावास्या | नक्षत्र: कृत्तिका
नमस्कार स्वामी भक्तांनो, आज १६ मे २०२६, शनिवार. आज वैशाख कृष्ण अमावास्या असून नक्षत्र कृत्तिका आहे. साप्ताहिक राशीभविष्यानुसार आजचा शनिवार हा मे महिन्यातील अनेक महत्त्वाच्या कामांना पूर्णत्वाकडे नेणारा ठरेल. मेष, सिंह, तूळ आणि मीन राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा ठरणार असला तरी काही राशींना सावधगिरी बाळगावी लागेल. शनिदेवाच्या आणि स्वामींच्या आशीर्वादाने आज तुमचे कर्माचे फळ कसे मिळेल? पाहूया मेष ते मीन सविस्तर राशीफळ.

♈ मेष

आज तुम्हाला वेळेच्या नियोजनाचा चांगला फायदा मिळेल. व्यवसायात मोठी भरभराट होईल. आर्थिक प्राप्ती चांगली झाल्यामुळे मन समाधानी राहील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

अंक: ९ रंग: निळा
उपay: शनी चालिसाचे पठण करा.

♉ वृषभ

नोकरीत किंवा व्यवसायात अनपेक्षित पण सकारात्मक बदल घडून येतील. धनलक्ष्मीची पूर्ण कृपा आज तुमच्यावर राहील. प्रवासात मात्र सतर्क राहण्याची अत्यंत गरज आहे.

अंक: ६ रंग: पांढरा
उपाय: मारुती स्तोत्राचे वाचन करा.

♊ मिथुन

आजचा उत्तरार्ध तुमच्यासाठी खूप चांगला आहे. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. नातेवाईकांच्या गाठीभेठी होऊन जुने मतभेद मिटतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

अंक: ५ रंग: हिरवा
उपाय: शनि देवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

♋ कर्क

आठवड्याच्या सुरुवातीला असलेल्या सर्व अडचणी आता पूर्णपणे दूर होतील. समाजात मानसन्मान वाढेल आणि वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. घरात उत्साहाचे वातावरण राहील.

अंक: २ रंग: चंदेरी
उपाय: स्वामी समर्थ तारक मंत्राचा पाठ करा.

♌ सिंह

व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढेल. मित्र-मैत्रिणींच्या भेटीमुळे नवीन योजना सुचतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. कष्टाचे चीज नक्की होईल.

अंक: १ रंग: सोनेरी
उपाय: हनुमान बाप्पाला बुंदीचा प्रसाद अर्पण करा.

♍ कन्या

आज महत्त्वाचे निर्णय घेताना दगदग करू नका. कोणावरही डोळे झाक करून विश्वास ठेवणे आज महागात पडू शकते. आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घ्या.

अंक: ५ रंग: राखाडी
उपाय: वाहन चालवताना 'ॐ शं शनैश्चराय नमः' चा जप करा.

♎ तूळ

आजचा शनिवार तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे श्रमाच्या जोरावर पूर्ण कराल. तुमच्या योजना गुप्त ठेवा.

अंक: ७ रंग: गुलाबी
उपाय: पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला.

♏ वृश्चिक

नोकरीत नवीन प्रकल्पांची जबाबदारी मिळेल. कौटुंबिक कामासाठी धावपळ वाढेल, मात्र कामात व्यस्त राहिल्याने मन आनंदी राहील. संयमाने कामे करा.

अंक: ९ रंग: मरून
उपाय: बजरंग बाण पठण करा.

♐ धनु

व्यवसायात अतिशय अनुकूल परिस्थिती राहील. नोकरीत नवीन जबाबदारीमुळे तुमचे महत्त्व वाढेल. उत्तरार्धात एखादी चांगली बातमी कळेल. प्रगतीचे योग आहेत.

अंक: ३ रंग: पिवळा
उपाय: दत्त बावनीचे पठण करा.

♑ mkar

जमिनीच्या व्यवहारात कागदपत्रांची विशेष काळजी घ्या. नोकरीत मोठी संधी चालून येईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढल्याने जुनी देणी पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.

अंक: ८ रंग: काळा
उपाय: शंकराच्या मंदिरात काळे तीळ अर्पण करा.

♒ कुंभ

अनेक दिवसांपासून समोरील असलेल्या अडचणी दूर होतील. व्यवसायात अचानक पैसा येईल. कलाकार मंडळींना नवीन व्यासपीठ आणि प्रोत्साहन लाभेल.

अंक: ४ रंग: जांभळा
उपाय: विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा.

♓ मीन

आजचा उत्तरार्ध तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. अचानक अनपेक्षित लाभ होण्याचे योग आहेत. सर्व आव्हानांवर स्वामींच्या कृपेने सहज मात कराल.

अंक: ३ रंग: चंदेरी
उपाय: स्वामी समर्थ नित्य नामस्मरण करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या