WWW.SWAMIMARG.ONLINE
दैनिक राशीभविष्य: २३ मे २०२६
॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ जय शनिदेव ॥
♈ मेष
आज व्यवसायात नवीन ओळखीच्या माध्यमातून भरभरात पाहायला मिळेल. कष्टाचे चीज होईल. आर्थिक प्राप्ती चांगली झाल्यामुळे हाती पैसा खेळता राहील. मात्र, वाहनाच्या वेगावर पूर्ण नियंत्रण ठेवा.
♉ वृषभ
आजचा दिवस मनाला आनंद देणारा ठरेल. अनुकूल ग्रहमानामुळे समोरील अनेक अडचणी दूर होतील. व्यवसायात प्रगती होईल आणि तुमच्या योजना लोकांना आवडतील. विवाह जुळण्याच्या हालचालींना वेग येईल.
♊ मिथुन
आज नवीन जबाबदारी मिळाल्यामुळे नोकरीत तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. उत्तरार्धात अचानक धनलाभ होण्याचे सुंदर योग आहेत. प्रवासात मात्र आज खूप सावध राहण्याची गरज आहे.
♋ कर्क
पैशाच्या देवाणघेवाणीत आणि उलाढालीत आज मोठा फायदा संभवतो. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित होईल. चैनीच्या वस्तू खरेदी करताना आर्थिक बजेटकडे पूर्ण लक्ष द्या. दिवस उत्साहाचा आहे.
♌ सिंह
ग्रहांची अनुकूलता आज तुम्हाला उत्तम लाभ मिळवून देईल. जुन्या किंवा नवीन मित्रांच्या भेटी फलद्रूप होतील. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आज योग्य आणि मोठी संधी लाभेल.
♍ कन्या
आजचा शनिवार पावले थोडी काळजीपूर्वक टाकण्याचा इशारा देत आहे. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आरोग्याची आणि आहाराची काळजी घ्या.
♎ तूळ
आज तुमच्या प्रगतीचा आलेख वेगाने उंचावणार आहे. कामाचे नेटके नियोजन करून बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष द्या. एखाद्या समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे आनंद वाढेल.
♏ वृश्चिक
व्यवसायात नवीन प्रयोग करून पाहण्यासाठी काळ अनुकूल आहे, मात्र मोहापासून दूर राहा. उत्तरार्धात अचानक धनलाभ होऊ शकतो. वाहन चालवताना वेगावर पूर्ण नियंत्रण ठेवा.
♐ धनु
आपल्या गुप्त योजना लोकांना सांगत बसू नका, काही लोक तुमच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. जोडीदाराशी संबंध सुधारतील. नवीन कामात आज संयम बाळगा.
♑ मकर
आजचा दिवस अत्यंत सुखद ठरेल. कामात मोठा उत्साह राहील. नोकरीत मोठी संधी मिळेल आणि आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, खाण्याचे पथ्य पाळा.
♒ कुंभ
नोकरीत अचानक पदोन्नती मिळण्याची किंवा पगारात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात अचानक चांगला पैसा येईल. मुलांच्या बाजूने मोठी आनंदाची बातमी मिळेल.
♓ मीन
नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याचा हा सुवर्णकाळ आहे. विविध आघाड्यांवर यश मिळेल. व्यवसायात बरकत राहील. मात्र, उत्तरार्धात आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्या.


0 टिप्पण्या