WWW.SWAMIMARG.ONLINE
दैनिक राशीभविष्य: २६ मे २०२६
॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ जय बजरंगबली ॥
♈ मेष
आज व्यवसायात भागीदारीच्या करारांमध्ये उत्तम यश मिळेल. व्यावहारिक चातुर्य वापरल्यास प्रलंबित प्रश्न सुटतील. मात्र, मोठे आर्थिक व्यवहार करताना पूर्वार्धात सावधानता बाळगा, विरोधकांच्या गुप्त कारवाया चालू शकतात. दुपारनंतर अनुकूलता लाभेल.
♉ वृषभ
आजचा दिवस तुमच्यासाठी कमालीचा अनुकूल वातावरणाचा राहील. आर्थिक आवक अतिशय उत्तम राहिल्याने जुनी चिंता दूर होईल. नोकरीच्या ठिकाणी नवी आणि मोठी जबाबदारी तुमच्याकडे येईल. विद्यार्थ्यांचे निकाल मनासारखे लागतील.
♊ मिथुन
आज चंद्राच्या अनुकूल भ्रमणामुळे थोरमोठ्यांचा सहवास लाभेल. जुन्या ओळखीचा व्यवसायात मोठा फायदा करून घेता येईल. नोकरीत नवीन जबाबदारीमुळे कामाचा ताण वाढला तरी तुमचा उत्साह द्विगुणित राहील. संवाद मधूर ठेवा.
♋ कर्क
चंद्राचे शुभ स्थान तुमच्या प्रपंचात आज अफाट सुखद वातावरण निर्माण करील. व्यवसायात चांगला धनलाभ होईल. नोकरीत नवी संधी मिळाल्यामुळे तुमचे कामाच्या ठिकाणी महत्त्व वाढेल. अधिकारी वर्गाचे पूर्ण सहकार्य लाभेल.
♌ सिंह
आज तुमच्या मनात प्रचंड सकारात्मक विचार राहतील. अडकलेले पैसे वसूल होण्यासाठी तुम्ही भीड न बाळगता केलेले प्रयत्न आज शंभर टक्के यशस्वी ठरतील. वडीलधाऱ्या मंडळींकडून योग्य ते आर्थिक आणि मानसिक मार्गदर्शन लाभेल.
♍ कन्या
सुरुवातीला कामाचा काहीसा ताण किंवा दगदग जाणवू शकते, परंतु दुपारनंतर परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरेल. नोकरीमध्ये चांगल्या सोयी-सुविधा मिळतील. हाती घेतलेले कठीण प्रकल्प सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वीपणे पूर्ण कराल.
♎ तूळ
आज पूर्वार्धात संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. पैसा चांगला मिळेल, पण तो गरजेच्या वस्तूंवर खर्चही होईल. लोकांशी व्यवहार करताना डोळे उघडे ठेवा, कोणीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू शकते. स्वतःच्या योजना गुप्त ठेवा.
♏ वृश्चिक
आज तुम्ही ठरवलेली अवघड कामे देखील अतिशय सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण अतिशय उत्तम राहील. महत्त्वाच्या भेटीगाठी यशस्वी ठरतील. व्यवसायातील नवीन जबाबदारी मुत्सद्दीपणाने हाताळा.
♐ धनु
आज नोकरीमध्ये नवीन आणि उत्तम संधी मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे वेळापत्रक व्यस्त होऊन जाईल. काही मत्सरी लोक कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करा. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील.
♑ मकर
आज चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण तुम्हाला विविध क्षेत्रात अतिशय सुखाचे आणि भाग्याचे अनुभव देईल. काही योगायोगाच्या चांगल्या घटना घडतील, ज्या प्रगतीला पूरक ठरतील. समाजात मान वाढेल आणि धनलक्ष्मीची पूर्ण कृपा राहील.
♒ कुंभ
आज पूर्वार्धात मनामध्ये काहीसे काळजीचे विचार राहू शकतात. जोडीदाराशी संवाद साधताना गैरसमज होणार नाहीत याची पूर्ण काळजी घ्या. वाहनाच्या वेगावर पूर्ण नियंत्रण ठेवा आणि महत्त्वाच्या कामात घाई गडबड करू नका.
♓ मीन
आज संमिश्र स्वरूपाचा दिवस आहे. नवीन जबाबदारी अंगावर आल्यामुळे काहीशी दगदग जाणवेल. लोकांकडून विनाकारण अपेक्षेभंग टाळण्यासाठी स्वतःच्या कामावर विसंबून राहा. व्यवसायात तुमचे अंदाज बरोबर ठरतील आणि गुंतवणूक फायदेशीर होईल.


0 टिप्पण्या