१० मे ते १६ मे २०२६
साप्ताहिक राशीभविष्य
॥ श्री स्वामी समर्थ ॥
♈ मेष
व्यवहार जपून करा
या सप्ताहात वेळेचे नियोजन चांगले कराल. मात्र, काही बदल झाल्यामुळे आवडी-निवडीच्या बाबतीत धरसोड करावी लागेल. व्यवसायात भरभराट होईल. सुरुवातीला आर्थिक प्राप्ती होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
♉ वृषभ
कामात बदल होतील
पूर्वर्धात ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. नोकरीत अचानक बदल होऊ शकतात, जे फायद्याचे ठरतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. प्रवासात सतर्क राहा. वाहन हळू चालवा.
♊ मिथुन
चांगली बातमी कळेल
सुरुवातीला पर्यटनाचे योग येतील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. उत्तरार्धात अचानक धनलाभ होईल. विवाह जुळण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे.
♋ कर्क
मानसन्मान मिळेल
सुरुवातीला काही अडचणी असल्या तरी धैर्याने तोंड द्या. बुधवारपासून अडचणी दूर होतील. सामाजिक मानसन्मान मिळेल. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. घरात लगबग राहील.
♌ सिंह
संमिश्र ग्रहमान राहील
कामात अनपेक्षित बदल होऊ शकतात. व्यवसायात लाभ होईल, पण धावपळ वाढेल. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. बुधवार, गुरुवार वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. शनिवारपर्यंत अडचणी दूर होतील.
♍ कन्या
दगदग करू नका
महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आरोग्याची काळजी घ्या. आहाराचे पथ्य पाळा. शुक्रवार, शनिवार वाहनावर नियंत्रण ठेवा. आर्थिक लाभ होऊ शकतो.
♎ तूळ
योजना गुप्त ठेवा
बुधवार व गुरुवार वगळता काळ अनुकूल राहील. सुरुवातीला प्रतिष्ठा वाढेल. कामात अडथळे येऊ शकतात, पण श्रमाने त्यावर मात कराल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. योजनांची गुप्तता पाळा.
♏ वृश्चिक
व्यस्त राहाल
सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. कौटुंबिक कामासाठी वेळ द्यावा लागेल. थोड्या संयमाने वागा. आपल्या योजना कोणाला सांगू नका.
♐ धनु
अनुकूलता राहील
व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल, ज्यामुळे तुमचे महत्त्व वाढेल. उत्तरार्धात चांगली बातमी मिळेल. मुलांची प्रगती होईल. विवाहेच्छुकांना अनुकूल फळे मिळतील.
♑ मकर
गुंतवणूक जपून करा
जमिनीचे व्यवहार ऐरणीवर येतील. कागदपत्रांची काळजी घ्या. व्यवसायात धावपळ होईल. आर्थिक गुंतवणूक करताना ज्येष्ठांचा सल्ला घ्या. नोकरीत मोठी संधी मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
♒ कुंभ
अडचणी दूर होतील
समोरील अनेक अडचणी दूर झाल्याने नवीन प्रकल्प आखण्यास वेळ मिळेल. व्यवसायात अचानक पैसा येईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. मुलांना चांगल्या संधी मिळतील.
♓ मीन
उत्तरार्ध चांगला जाईल
सुरुवातीला कामात गुंतून राहाल. कायद्याची बंधने पाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. बुधवारपासून अडचणी दूर होतील. शुक्रवार, शनिवार अनपेक्षित लाभ होईल. सर्व अडचणींवर मात कराल.


0 टिप्पण्या