WWW.SWAMIMARG.ONLINE
दैनिक राशीभविष्य: ३० जून २०२६
॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ जय श्रीराम जय हनुमान ॥
♈ मेष रास
आज पूर्णिमेच्या शुभ योगामुळे तुमच्या प्रपंचात अत्यंत आनंदाचे वातावरण राहील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी किंवा नोकरीत उत्तम सुवर्णसंधी चालून येईल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ होईल. जोडीदाराकडून मोठा सन्मान आणि प्रेम लाभेल.
♉ वृषभ रास
आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. व्यवसायात आर्थिक आवक चांगली असली, तरी विनाकारण काही मोठ्या खर्चांना सामोरे जावे लागू शकते. प्रपंचात कुटुंबियांशी बोलताना संयम ठेवा. आरोग्याची आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या.
♊ मिथुन रास
आज चंद्र तुमच्या सप्तम भावात भाग्यशाली भ्रमण करत असल्याने प्रपंचात जीवनसाथीचे अद्भूत सहकार्य लाभेल. भागीदारीच्या व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल. जुने रखडलेले कायदेशीर किंवा कोर्टाचे प्रश्न आज मार्गी लागतील.
♋ कर्क रास
आज नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचा प्रभाव वाढेल आणि विरोधक शांत होतील. मात्र, आज डोके शांत ठेवून काम करावे लागेल. पैशांचे व्यवहार करताना पूर्णपणे डोळस राहा. प्रप्रंचातील कोणतीही गुप्त माहिती अनोळखी व्यक्तींना सांगू नका.
♌ सिंह रास
आज पूर्णिमेचा चंद्र तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरेल. कला, क्रीडा आणि बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी प्रसिद्धी व नवी संधी लाभेल. आर्थिक बाजू अत्यंत बळकट बनेल. प्रपंचात संततीकडून अत्यंत सुखद वार्ता कानावर पडेल.
♍ कन्या रास
आज प्रपंचात जमिनीचे किंवा वाहन खरेदीचे तुमचे जुने बेत यशस्वी होतील. गृहसौख्य उत्तम लाभेल आणि आईकडून मोठे सहकार्य व आशीर्वाद मिळतील. नोकरीमध्ये तुमच्या सुप्त गुणांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगले वाव मिळेल.
♎ तूळ रास
आज तुमच्या पराक्रमात आणि आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. व्यवसायानिमित्त केलेले लहान प्रवास भविष्यात मोठा आर्थिक फायदा मिळवून देतील. जुनी दिलेली उधारी आज अचानक परत मिळाल्याने आर्थिक विवंचना पूर्णपणे दूर होईल.
♏ वृश्चिक रास
आज धनलाभाचे अतिशय उत्तम आणि अद्भूत योग आहेत. वाणीमध्ये कमालीचा गोडवा राहिल्याने प्रपंचात आणि व्यवसायात कठीण प्रश्न सहजासहजी सुटतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल.
♐ धनु रास
चंद्र आज तुमच्याच राशीत पूर्णिमेच्या पूर्ण बळासह संचार करत असल्याने मनाला अपूर्व शांतता आणि उत्साह लाभेल. नोकरी आणि व्यवसायातील प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे आज भाग्याच्या जोरावर सहजासहजी पूर्ण होतील. मान-सन्मान वाढेल.
♑ मकर रास
आजचा दिवस प्रपंचात थोडा धावपळीचा आणि खर्चाचा राहू शकतो, त्यामुळे बजेट पाळा. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. मात्र, सासरच्या मंडळींकडून अचानक एखादी शुभ वार्ता किंवा मोठी मदत मिळण्याची दाट शक्यता आहे.
♒ कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा पूर्णिमेचा योग अफाट धनलाभाची सुवर्णसंधी घेऊन आला आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मित्रांच्या आणि वरिष्ठ व्यक्तींच्या मोलाच्या मदतीमुळे तुमचे मोठे व्यावसायिक उद्दिष्ट पूर्ण होईल.
♓ मीन रास
नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने आजचा मंगळवार अत्यंत यशाचा जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर प्रभावित होऊन प्रमोशन किंवा नवीन अधिकार देण्याचे संकेत आहेत. प्रपंचात मान वाढेल आणि वडिलांचे आरोग्य सुधारेल.


0 टिप्पण्या