📿 साप्ताहिक राशीभविष्य — ७ जून ते १३ जून २०२६ ⚖️

साप्ताहिक राशीभविष्य — ७ जून ते १३ जून २०२६ | स्वामी मार्ग

WWW.SWAMIMARG.ONLINE

साप्ताहिक राशीभविष्य: ७ जून ते १३ जून २०२६

॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ शुक्र गोचर आणि एकादशी विशेष ॥

विशेष महागोचर: या सप्ताहात दि. ८ जून रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल, जिथे त्याची गुरूशी युती होईल!
नमस्कार स्वामी भक्तांनो! ७ जून ते १३ जून २०२६ या सप्ताहाच्या मुख्य पंचांग गणितानुसार या सप्ताहात दि. ८ जून रोजी शुक्र कर्क राशीत जाईल. अन्य कुठलेही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी— मंगळ मेष राशीत, रवी आणि हर्षल वृषभ राशीत आहेत. बुध आणि शुक्र मिथुन राशीत आहेत. दि. ८ रोजी शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. तिथे त्याची युती गुरूशी होईल. केतू सिंह राशीत, प्लूटो मकर राशीत, तर राहू कुंभ राशीत आहे. शनी आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्र भ्रमण कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशीतून राहील. या सप्ताहात दि. ११ रोजी कमला एकादशी, तर दि. १२ रोजी प्रदोष आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार हे चारही दिवस पंचक आहे. गुरुवारी सकाळी ८.१७ वाजता पंचक सुटेल. रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी अधिक ज्येष्ठ कृष्ण सप्तमी (दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री ३.२५ वाजेपर्यंत) आहे. सकाळी ७.५६ वाजेपर्यंत धनिष्ठा, तर त्यानंतर शततारका नक्षत्र आहे. रास कुंभ आहे. आज दिवस चांगला आहे. भानुसप्तमी आहे. पंचक आहे. राहू काळ सायंकाळी ४.३० ते ६ या वेळेत राहील. (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.) या सर्व ग्रहमानाचा १२ राशींवर होणारा सविस्तर परिणाम खालीलप्रमाणे आहे:

♈ मेष (Aries)

ग्रहमान पोषक राहील: या सप्ताहात ग्रहमान आपल्याला पोषक राहील. घरात मंगलमय वातावरण राहील. घराच्या सुशोभीकरणाकडे लक्ष द्याल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. तीर्थयात्रा घडून येतील. मात्र मंगळवार, बुधवार प्रवासात सतर्क राहा. अनोळखी लोकांपासून सावध राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. गुरुवारपासून अधिकच अनुकूलता जाणवेल. अडचणी दूर होतील, मनात आनंदी विचार राहतील. विवाहेच्छूंसाठी अनुकूल काळ आहे. लाभ होईल.

चांगले दिवस: रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार

♉ वृषभ (Taurus)

धनलक्ष्मीची कृपा राहील: सुरुवातीला कामाचा थोडा ताण राहील. वरिष्ठांशी वादविवाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. कामातील बदलांकडे सकारात्मक पद्धतीने पाहा. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. नोकरीत आर्थिक प्राप्ती चांगली होईल. गुरुवार, शुक्रवार अचानक प्रवास करावा लागेल, प्रवासात ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल होऊ शकतात. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील, आपले ध्येय साध्य करणे शक्य होईल, अचानक प्रवास करावा लागेल.

चांगले दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार

♊ मिथुन (Gemini)

मोठे काम होईल: शनिवारवगळता इतर काळात तुम्हाला अनुकूल वातावरण राहील. शैक्षणिक प्रगतीपुस्तक झळकते राहील. काहींना प्रवास घडून येईल. सार्वजनिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. मात्र, टीका करणाऱ्या प्रत्येकाकडे लक्ष देऊ नका. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. घरी पाहुणे मंडळी येतील. गुरुवार, शुक्रवार एखादे मोठे काम यशस्वीपणे होईल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. शनिवारी कायद्याची बंधने पाळा. प्रवासात सतर्क राहा.

चांगले दिवस: रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार

♋ कर्क (Cancer)

प्रगती होईल: सुरुवातीला रविवार, सोमवार आपण संयमाने वागण्याची गरज आहे. या काळात वाहन जपून चालवा. महत्त्वाच्या कामांची फक्त पूर्वतयारी करून ठेवा. मंगळवारपासून तुमच्या समोरील अडचणी दूर होतील. तुमची प्रगती कोणी अडवू शकणार नाही. समाजात तुमचे महत्त्व वाढेल. नोकरीत गुरुवार, शुक्रवार अचानक मोठी संधी मिळेल, पगारवाढ व पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. धनलक्ष्मीची तुमच्यावर प्रसन्नता राहील. शनिवारी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वाहनावर नियंत्रण ठेवा.

चांगले दिवस: बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार

♌ सिंह (Leo)

उत्तरार्ध अनुकूल राहील: पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात तुमची आर्थिक चांगली परिस्थिती राहील. रविवार, सोमवार भागीदारी व्यवसायात गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. वेळेचे नियोजन नीट करा. अनावश्यक कामांसाठी वेळ देऊ नका. मंगळवार, बुधवार काही अडचणी येतील, प्रवासात सतर्क राहा, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. गुरुवारपासून परिस्थिती नियंत्रणात येईल, समाजात तुमचा मान वाढेल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. प्रसिद्धी मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल.

चांगले दिवस: रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार

♍ कन्या (Virgo)

संमिश्र ग्रहमान राहील: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. नोकरीत सुरुवातीला काही बदल होऊ शकतात. आपल्या योजना लोकांना सांगत बसू नका. नोकरीत तुमच्या शब्दांना किंमत दिली जाईल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. गुरुवार, शुक्रवार वाहन जपून चालवा. एखाद्या कामात अचानक अडथळा येऊ शकतो. काहींना अचानक धनलाभ होईल.

चांगले दिवस: मंगळवार, बुधवार, शनिवार

♎ तूळ (Libra)

मुले प्रगती करतील: या सप्ताहात आपल्याला काही आघाड्यांवर अनुकूल फळे मिळतील. मात्र, बेफिकीरपणे वागून चालणार नाही. शैक्षणिक प्रगतीपुस्तक झळकते राहील. सुरुवातीला जवळचा प्रवास होईल. मुले प्रगती करतील. मंगळवार, बुधवार आरोग्याची काळजी घ्या, तुमच्या योजना गुप्त ठेवा. कामात काही बदल होऊ शकतात. गुरुवार, शुक्रवार चांगले अनुभव येतील. विवाहोत्सुकांना चांगली स्थळे सांगून येतील. नोकरीत सोयी-सुविधा वाढवून मिळतील. शनिवारी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

चांगले दिवस: रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार

♏ वृश्चिक (Scorpio)

अडचणी दूर होतील: सुरुवात उत्साहात होईल, मात्र, कामाचा ताण राहील, तो आपण नीट हाताळला तर अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. अडचणींचे आपोआप निराकरण होईल, त्यामुळे मनावरील एखादे दडपण निघून जाईल. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. सामाजिक मानसन्मान मिळेल. मात्र गुरुवार, शुक्रवार प्रकृतीची काळजी घ्या. आजोळकडील नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. कुणाला आश्वासन देऊ नका.

चांगले दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार

♐ धनु (Sagittarius)

भेटीगाठी होतील: नोकरी व्यवसायात तुमची चलती राहील. आर्थिक गरजा पूर्ण होतील, पैशाची चणचण भासणार नाही, मात्र, कुणाचे ऐकून गुंतवणूक करू नका. भावंडांच्या भेटीगाठी होतील, त्यांच्या मतांचा मान राखा. जवळचा प्रवास होईल. नवीन जबाबदारीचा ताण व्यवस्थित हाताळा. घरी पाहुणे मंडळी येतील. काही कारणाने त्यांच्याशी गैरसमज होऊ शकतात. गुरुवार, शुक्रवार अचानक एखादी चांगली बातमी कळेल. शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत राहील, प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल.

चांगले दिवस: मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार

♑ मकर (Capricorn)

योग्य संधी मिळेल: चंद्राचे धनस्थानापासून ते पंचम स्थानापर्यंत होणारे भ्रमण अनुकूल राहील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मालमत्तेची कामे होतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. गुरुवार, शुक्रवार नोकरीत योग्य संधी मिळेल आणि त्यातून आर्थिक लाभ होतील. घरात मंगलमय वातावरण राहील. विवाहेच्छूंना अनुकूल वातावरण राहील.

चांगले दिवस: रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार

♒ कुंभ (Aquarius)

अडचणी दूर होतील: जनसंपर्क चांगला राहील. वडीलधाऱ्या मंडळींकडून आशीर्वाद मिळतील. तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर झालेल्या असतील. सुरुवातीला जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. मात्र, कागदोपत्री व्यवहार करताना थोडे सावध रहा. व्यवसायात भरभराट होईल, मालाची विक्री चांगली होईल. तुमच्या योजना लोकांना आवडतील. मौजमजा करण्याच्या निमित्ताने जवळचा प्रवास होईल. भावंडांशी सलोखा राहील.

चांगले दिवस: मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार

♓ मीन (Pisces)

भेटवस्तू मिळतील: पूर्वार्धात संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. रविवार, सोमवार महत्त्वाच्या कामात अडथळा येईल, प्रवासात सतर्क रहा. अनोळखी व्यक्तींना तुमची गोपनीय माहिती देऊ नका. मंगळवारपासून परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल, मात्र जीवनसाथीशी गैरसमज टाळा. विवाहेच्छूंनी स्वभावाची नीट शहानिशा करून घेतली पाहिजे. गुरुवारपासून दिवसाला दिवस प्रगती होईल. धनलक्ष्मीची कृपा राहील. भेटवस्तू मिळतील.

चांगले दिवस: बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या