📿 साप्ताहिक राशीभविष्य: ०५ जुलै ते ११ जुलै २०२६ ⚖️

साप्ताहिक राशीभविष्य: ०५ जुलै ते ११ जुलै २०२६ | स्वामी मार्ग

WWW.SWAMIMARG.ONLINE

साप्ताहिक राशीभविष्य: ०५ जुलै ते ११ जुलै २०२६

॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ लोकमत साप्ताहिक पंचांग विशेष ॥

विशेष पर्व: शुक्रवारी योगिनी एकादशी | शनिवारी भागवत एकादशी
नमस्कार स्वामी भक्तांनो, ५ ते ११ जुलै २०२६ या सप्ताहाचे अधिकृत ज्योतिषीय विश्लेषण घेऊन आम्ही आलो आहोत. या सप्ताहात शुक्र आणि बुध यांचा राशिपालट आहे. ग्रहस्थिती अशी: मंगल आणि हर्षल वृषभ राशीत आहेत, रवी मिथुन राशीत आहे, तर दि. ७ पासून बुध पण मिथुन राशीत येत आहे. गुरु व शुक्र कर्क राशीत एकत्र आहेत. दि. ९ पासून शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल, जिथे शनीची दृष्टी युती केतूशी होईल. प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत, तर शनी आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशीतून राहील. रविवार, सोमवार, मंगळवार हे तिन्ही दिवस पूर्ण काल पंचक आहे. बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत पंचक राहील. या सप्ताहात शुक्रवारी योगिनी एकादशी, तर शनिवारी भागवत एकादशी आहे. पाहूया १२ राशींचे साप्ताहिक भाग्यफळ.

♈ मेष रास

पूर्वाार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध तुम्हाला अधिक चांगला जाईल. तुमची खोळंबून राहिलेली अनेक कामे गती घेतील. मात्र, सुरुवातीला थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. रविवारी व्यवहार जपून करा, कुणी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. सोमवार, मंगळवार, बुधवार अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, कायद्याची बंधने पाळा. गुरुवारपासून परिस्थिती नियंत्रणात येईल आणि चांगल्या बातम्या कळतील. धनलक्ष्मीची कृपा राहील.

शुभ दिवस: रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार

♉ वृषभ रास

पूर्वाार्ध अनुकूल राहील. पूर्वार्धात ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. महत्त्वाची कामे आपण मंगळवारच्या आत आटोपून घ्या, त्यामुळे तुम्हाला जास्त दगदग न करता सफलता मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल, त्यामुळे सुरुवातीला व्यस्त राहाल. पण अनेकांच्या सहकार्यामुळे कामे पार पडतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. गुरुवार, शुक्रवारी तुमच्यासमोर अडचणी येतील, संयम बाळगा. शनिवारी मोकळा वेळ मिळेल व भेटवस्तू मिळतील.

शुभ दिवस: रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार

♊ मिथुन रास

शनिवार वगळता इतर काळात तुम्हाला चांगले अनुभव येतील. सुरुवातीला एखादी चांगली बातमी लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. सोमवार, मंगळवार नोकरीत अचानक नवीन जबाबदारी मिळेल, त्यामुळे तुमचे वेळापत्रक व्यस्त होऊन जाईल. घरातील सदस्यांची काळजी घ्या. बुधवारपासून अनुकूलता जास्त प्रमाणात अनुभवायला मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. प्रेमात सफलता मिळेल. शनिवारी अचानक खर्च होईल.

शुभ दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार

♋ कर्क रास

सप्ताहाची सुरुवात थोडी दगदगीने होईल. मात्र, सोमवारपासून तुम्हाला प्रत्येक कामात सफलता मिळेल. लोकांचे चांगले सहकार्य लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. लोकांकडून मानसन्मान मिळेल. काहीना प्रवास घडून येईल. बुधवारपासून कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा वाढेल, नवीन प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. घरी पाहुणे मंडळी येतील. शुक्रवार, शनिवार धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील, भेटवस्तू मिळतील. मनात सकारात्मक विचार राहतील.

शुभ दिवस: मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार

♌ सिंह रास

पूर्वाार्धात संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. वेळ वाया घालवू नका. वाहन जपून चालवा. व्यावसायिक करार करताना खबरदारी घ्या. गुरुवारपासून परिस्थिती नियंत्रणात येईल. एखादी चांगली बातमी कळेल. अनेक अडचणी दूर झाल्यामुळे तुम्हाला हलके हलके वाटेल. आर्थिक स्थिती चांगली होईल. सामाजिक मानसन्मान मिळेल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. मुलांची प्रगती होईल. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल.

शुभ दिवस: रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार

♍ कन्या रास

संमिश्र ग्रहमान राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याच्या किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी असतील. कामात विलंब होईल. कामातील बदलांमुळे तुम्हाला थोडे व्यस्त राहावे लागेल. जीवनसाथीशी किरकोळ कारणावरून गैरसमज होऊ शकतात. गुरुवार, शुक्रवार महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. वाहन हळू चालवा. काहीना अचानक धनलाभ होऊ शकतो. शनिवारी कुणाची तरी अवचितपणे मदत मिळून अडचणी दूर होतील.

शुभ दिवस: सोमवार, मंगळवार, शनिवार

♎ तूळ रास

लोकांच्या भरवशावर विसंबून राहू नका, अन्यथा पाहिजे तसे यश मिळणार नाही. महत्त्वाचे निर्णय घेताना थोडी गुप्तता पाळली पाहिजे. तब्येतीची काळजी घ्या, आहार आणि आराम याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. व्यवसायात भरभरात होण्याच्या दृष्टीने गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस असतील. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. शनिवारी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा, घाईत कामे करू नका.

शुभ दिवस: रविवार, गुरुवार, शुक्रवार

♏ वृश्चिक रास

प्रगती होईल. नोकरी, शिक्षण, लग्नकार्य, व्यावसायिक प्रगती इत्यादी दृष्टीने चांगला काळ आहे. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. सुप्रवाताला नोकरीत नवीन संधी मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना मुलाखतीचे बोलावणे येऊ शकेल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. मात्र, त्यांच्या कलान घ्या. गुरुवार, शुक्रवार आरोग्याची काळजी घ्या. आपल्या योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे. शनिवारी मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल, मात्र मोहापासून दूर राहा.

शुभ दिवस: रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार

♐ धनु रास

व्यावसायिक करार करताना खबरदारी घ्या, घाईघाईत मोठे निर्णय घेऊ नका. भावंडांशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. काहीना अचानक प्रवास करावा लागेल, प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. नोकरीत काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. घरी पाहुणे मंडळी येतील, काही घरगुती प्रश्न सतावतील. मात्र, संयम ठेवला तर त्यातून लवकरच मार्ग निघेल. तरुण वर्गाला प्रेमात चांगला प्रतिसाद मिळेल. मुलांची प्रगती होईल. शनिवारी आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिवस: मंगळवार, बुधवार, गुरुवार

♑ मकर रास

व्यस्त राहाल. सतत कशात ना कशात व्यस्त राहाल. वडिलांच्या संपत्तीची कामे करताना कागदपत्रांची पूर्तता करताना खबरदारी घ्या. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. भावंडांशी गैरसमज होऊ शकतात. व्यवसायात तुमच्या बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो, त्यादृष्टीने गुरुवारी, शुक्रवारी सावधगिरी बाळगा. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. घरी पाहुणे मंडळी येतील, घरच्यांच्या भेटीसाठी वेळ द्यावा लागेल. शनिवारी चांगली बातमी कळेल, विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे.

शुभ दिवस: रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार

♒ कुंभ रास

वादात पडू नका. सुरुवातीला मनात काळजीचे विचार असतील. लोकांकडून फार अपेक्षा ठेवू नका. वडिलांच्या संपत्तीची कामे करताना काही अडचणी येतील, वाद होणार नाही याची काळजी घ्या. गुरुवारपासून परिस्थिती आटोक्यात येईल. व्यवसायात तेजीचा अनुभव येईल. मात्र, मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. काहीना जवळच्या प्रवासाचे योग येतील. शनिवारी घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, घरी पाहुणे येतील. नोकरीत अनपेक्षित बदल होतील.

शुभ दिवस: रविवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार

♓ मीन रास

उत्तरार्धात यश मिळेल. पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध तुम्हाला चांगला राहील. सुरुवातीला तुमच्यासमोर अडचणी असतील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. सोमवार, मंगळवार मनात शंका असतील. जीवनसाथीशी गैरसमज होऊ शकतात, सकारात्मक विचार करा. गुरुवार, शुक्रवारी महत्त्वाची कामे होतील, आर्थिक आवक चांगली राहील. शनिवारी व्यवसायात तेजी राहील, मात्र गुंतवणूक करताना घाई करू नका.

शुभ दिवस: बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या