⚖️ साप्ताहिक राशीभविष्य — २ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२६ 📿

साप्ताहिक राशीभविष्य — २ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२६ | स्वामी मार्ग

WWW.SWAMIMARG.ONLINE

साप्ताहिक राशीभविष्य: २ ते ८ ऑगस्ट २०२६

॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ ॐ नमः शिवाय ॥

आषाढ कृष्ण पक्ष | संकष्टी चतुर्थी व ग्रहगोचर विशेष

✨ या सप्ताहातील ग्रहस्थिती व मुख्य पंचांग योग

या सप्ताहात मंगळ आणि बुध यांचे राशीपालट होत आहेत. दि. २ रोजी मंगळ मिथुन राशीत, तर दि. ५ रोजी बुध कर्क राशीत प्रवेश करेल. ग्रहस्थिती अशी आहे: मंगळ व हर्शल वृषभ राशीत असून रविवारी रात्री १०:५१ वाजता मंगळ मिथुन राशीत जाईल. रवी, गुरु आणि बुध कर्क राशीत आहेत. बुधवारी बुध सिंह राशीत जाईल, तिथे त्याची युती केतूशी होईल. शुक्र कन्या राशीत, प्लुटो मकर राशीत तर राहू कुंभ राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण कुंभ, मीण, मेष, वृषभ आणि मिथुन राशीतून राहील.

विशेष योग: रविवारी (२ ऑग) संकष्टी चतुर्थी (रात्री ११:५६ वाजेपर्यंत). पूर्वा भाद्रपदा व उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. दुपारी ३:२७ वाजेपर्यंत चंद्र कुंभ राशीत, त्यानंतर मीन राशीत राहील. आज संकष्टी चतुर्थीचा चांगला दिवस आहे. रविवारी सायंकाळी ४:३० ते ६ पंचक आहे. रविवार, सोमवार, मंगळवार हे तीन दिवस पंचक राहील (मंगळवारी रात्री ९:५४ वाजता पंचक सुटेल).

♈ मेष रास

पगारवाढ मिळेल: पूर्वार्धात काही अडचणी असतील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका, प्रसंगी वेळ लागला तरी हरकत नाही; पण कागदपत्रे नीट वाचून घ्या. त्यामुळे भविष्यात तुम्हाला अडचणी राहणार नाहीत. बुधवारपासून अडचणी दूर होतील, त्यामुळे तुम्हाला हलके-हलके वाटेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल, स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. प्रेमात सफलता मिळेल. शुक्रवार, शनिवार धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील.

टीप: बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

♉ वृषभ रास

धनलक्ष्मीची कृपा राहील: सप्ताहाची सुरुवात थोडी ताणतणावात होईल. नोकरीत वरिष्ठांशी गैरसमज होऊ शकतात. मात्र तुमचे महत्त्व लवकरच त्यांना पटेल. जवळच्या नातेवाईकांच्या भेटीसाठी अडचणी दूर होतील, धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. मात्र आर्थिक उलाढाल करताना काळजी घ्या. कोणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकते. बुधवार, गुरुवार प्रवासात सतर्क रहा. नियमांचे काटेकोरपणे पालन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. शुक्रवारपासून अनुकूलता अनुभवायला मिळेल. मात्र मोहापासून दूर रहा.

टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, शुक्रवार चांगले दिवस.

♊ मिथुन रास

पूर्वार्ध अनुकूल राहील: पूर्वार्धात ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. महत्त्वाची कामे सुरुवातीला आटोपून घ्या. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. काहींना पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. मात्र प्रवासात अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. नोकरीत कामाचा ताण असला तरी अनेकांचे सहकार्य मिळेल, त्यामुळे कामे आटोक्यात येतील. बुधवार, गुरुवार सोप्या पद्धतीने यश मिळेल, धनलाभ होईल. शुक्रवार, शनिवार अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

टीप: मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

♋ कर्क रास

नवीन संधी मिळेल: या सप्ताहात तुमच्या मनात एखादी नावीन्यपूर्ण कल्पना विकसित होईल. त्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले जाईल. सुरुवातीला वाहने जपून चालवा, प्रवासात मौल्यवान वस्तू, कागदपत्रे सांभाळा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, नोकरीत नवीन संधी मिळेल. त्यामुळे पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. अचानक काही लाभ होईल, घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील, त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल.

टीप: बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

♌ सिंह रास

उत्तरार्धात यश मिळेल: पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात सफलता मिळेल. मंगळवारपर्यंत कामाचा ताण राहील, या काळात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. वाहनाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे लागेल. बुधवारपासून अनुकूल परिस्थिती राहील, चांगल्या बातम्या कानावर पडतील. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. लोकांकडून तुम्हाला मानसन्मान मिळेल. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. व्यावसायिक करारात मदत होतील. आर्थिक स्तर उंचावेल. घरी पाहुणे मंडळी येतील.

टीप: बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

♍ कन्या रास

संमिश्र ग्रहमान राहील: या सप्ताहात आपल्याला संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. सुरुवातीला एखाद्या नवीन उपक्रमात सहभागी व्हाल. कोणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल, त्या दृष्टीने थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. बुधवार, गुरुवार महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. शुक्रवार, शनिवार तुमच्या अनेक अडचणी दूर होतील.

टीप: सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

♎ तूळ रास

कटू-गोड अनुभव येतील: काही कटू, तर काही गोड अनुभव येतील. सुरुवातीला काही अडचणी असतील, आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आहाराचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. तुमच्या योजना गुप्त ठेवा, काही लोक तुमच्या विरोधात गुप्तपणे कारवाया करतील. बुधवार, गुरुवार तुमच्या अनेक अडचणी दूर होतील. जोडीदाराशी चांगला संवाद राहील. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. नोकरीत तुमचे पाऊल दृढ राहील. शुक्रवार, शनिवार कामात अडथळा येईल, काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो.

टीप: रविवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

♏ वृश्चिक रास

मोहापासून दूर रहा: बुधवार, गुरुवार वगळता बाकीच्या काळात तुम्हाला अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या योग्यतेची दखल घेतली जाईल. मुलांच्या संगतीकडे लक्ष द्या, त्यांच्याशी संवाद ठेवा. काहींना जवळचा प्रवास करावा लागेल. बुधवार, गुरुवार आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत अचानक बदल होऊ शकतो. शुक्रवार, शनिवार व्यवसायात भरभराट होईल. मात्र पैशाचा हिशेब ठेवण्यात चालढकल करता कामा नये. हाती पैसा खेळता राहील. तरुणवर्गाने मोहापासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे.

टीप: सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

♐ धनु रास

पूर्वार्ध अनुकूल राहील: महत्त्वाची कामे आपण सप्ताहाच्या पूर्वार्धात करून घ्या. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे, सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात एखाद्या कार्यक्रमाची लगबग राहील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल काळ आहे, काहींना प्रवास घडून येईल. शुक्रवार, शनिवार आरोग्याची काळजी घ्या. आहाराचे पथ्य पाळा. लोकांना प्रत्युत्तर देण्यात महत्त्वाचा वेळ वाया घालवू नका.

टीप: सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

♑ मकर रास

नवीन संधी मिळेल: चंद्राचे धनस्थानापासून ते पंचमस्थानापर्यंत होणारे भ्रमण तुम्हाला चांगली फळे देईल. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. हाती पैसा येईल, मात्र मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. नोकरीत नवीन संधी मिळेल, घरी पाहुणेमंडळी येतील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. तरुणवर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल, काहींना पुरस्कार जाहीर होतील.

टीप: रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

♒ कुंभ रास

भरभराट होईल: सुरुवातीला मनात काळजीचे विचार राहतील. मात्र, लवकरच परिस्थिती तुमच्या बाजूने होईल. जुनी येणी वसूल होतील. जमिनीच्या व्यवहारात थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. नीट माहिती घेऊन व्यवहार करा. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळता राहील. आर्थिक निर्णय मात्र जपून घ्या. काहींना जवळचा प्रवास घडून येईल. घरी अचानक पाहुणेमंडळी येतील, नोकरीत बदल होतील.

टीप: बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

♓ मीन रास

प्रेमात सफलता मिळेल: सप्ताहाची सुरुवात थोडी धावपळीने होईल. मात्र, यशाकडे नेणारा काळ आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. तरुणवर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. तुमच्या योजना लोकांना आवडतील. धनलक्ष्मीची तुमच्यावर प्रसन्नता राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. वडिलांच्या साहाय्याने संपत्तीची कामे होतील. उत्तरार्धात जवळच्या नातेवाईकांच्या भेटी होतील.

टीप: मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या