⚖️ साप्ताहिक राशीभविष्य — ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ 📿

साप्ताहिक राशीभविष्य — ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ | स्वामी मार्ग

WWW.SWAMIMARG.ONLINE

साप्ताहिक राशीभविष्य: ९ ते १५ ऑगस्ट २०२६

॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ ॐ नमः शिवाय ॥

आषाढ कृष्ण पक्ष ते श्रावण प्रारंभ | कामिका एकादशी व दीपपूजन विशेष

✨ या सप्ताहातील ग्रहस्थिती व मुख्य पंचांग योग

या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी— हर्शल वृषभ राशीत, मंगळ मिथुन राशीत, रवी, बुध आणि गुरू कर्क राशीत, केतू सिंह राशीत, प्लुटो मकर राशीत, तर राहू कुंभ राशीत आहे. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींमधून राहील.

विशेष योग: या सप्ताहात रविवारी (९ ऑग) कामिका एकादशी (सकाळी ११:०६ वाजेपर्यंत) आहे. दुपारी २:४५ वाजेपर्यंत मृग नक्षत्र, त्यानंतर आर्द्रा नक्षत्र राहील. रास मिथुन आहे. आज चांगला दिवस आहे, कामिका एकादशी व्रत आहे. राहू काळ सायंकाळी ४:३० ते ६ या वेळेत राहील. सोमवारी प्रदोष, तर बुधवारी दर्श अमावास्या (दीपपूजन) आहे. गुरुवारपासून श्रावण मास सुरू होत आहे. शनिवारी स्वातंत्र्य दिन आहे.

♈ मेष रास

अनुकूल वातावरण राहील: शनिवार वगळता एकंदरीत सप्ताह तुम्हाला यश देणारा ठरेल. सुरुवातीला व्यवसायात तेजी राहील, हाती पैसा येईल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील, मोठी संधी मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे, वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील, भेटीगाठी फलद्रूप होतील. परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. काहींना जवळचा प्रवास करावा लागेल, शनिवारी आरोग्याची काळजी घ्या. आजोळचे लोक भेटतील.

टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

♉ वृषभ रास

शुभ फळे मिळतील: चंद्राचे धनस्थानापासून ते पंचमस्थानापर्यंत होणारे भ्रमण तुम्हाला शुभ फळे देणारे ठरेल. सुरुवातीला अचानक मोठा आर्थिक फायदा होईल. वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद मिळतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल, महत्त्वाचे निरोप येतील. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. मात्र मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. भावंडांशी गैरसमज होतील, नोकरीत नवीन बदल होतील. कामाचा ताण राहील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील.

टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस.

♊ मिथुन रास

अडचणी दूर होतील: सुरुवात उत्साहात होईल, मनात आनंदी विचार राहतील. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील, अडचणी दूर झाल्यामुळे तुम्हाला हलके हलके वाटेल. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. मात्र क्षणिक मोहाला बळी पडता कामा नये. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. पुरेसा पैसा हाती असल्यामुळे खर्चाच्या बाबतीत हात थोडा दिला जाऊ शकतो. मात्र, त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते, खर्चावर नियंत्रण ठेवा. भावंडांशी मतभेद होऊ शकतात. गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्या.

टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

♋ कर्क रास

चैनीवर खर्च कराल: सुरुवातीला तुमच्या समोर काही अडचणी असतील. एखाद्या कामासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील, प्रवासात सतर्क रहा. मंगळवारपासून परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. मात्र वादापासून दूर रहा, जोडीदाराचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. उत्तरार्धात वारसाहक्काची कामे ऐरणीवर येतील, मात्र कागदपत्रे नीट वाचून घ्या. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. शनिवारी जवळचे प्रवास होतील.

टीप: मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

♌ सिंह रास

वाद टाळा: सुरुवातीला आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. एखाद्या महत्त्वाच्या कामात सोप्या रीतीने यश मिळेल. लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल, मानसन्मान प्राप्त होतील. मात्र, मंगळवार, बुधवार काही अडचणी असतील. हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील, प्रवासात सतर्क रहा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. कसल्याही बंधने पाळण्यात हयगय करू नका. सार्वजनिक कार्यात अनावश्यक जबाबदारी घेऊ नका. 'सोशल मीडिया'वर प्रतिक्रिया देणे टाळा. गुरुवारपासून अनुकूलता राहील.

टीप: रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

♍ कन्या रास

पूर्वार्ध अनुकूल राहील: पूर्वार्धात ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. तुमच्या हातून मोठी कामे होतील. लोकांकडून तुम्हाला मानसन्मान मिळेल, नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोयी-सुविधा वाढवून मिळतील, घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, पाहुणे मंडळी येतील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. मात्र, गुरुवार व शुक्रवार अतिआत्मविश्वास दाखवू नका.

टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

♎ तूळ रास

फायदे होतील: चंद्राचे भाग्यस्थानापासून ते लाभस्थानापर्यंत होणारे भ्रमण तुम्हाला फायदेशीर ठरेल. सुरुवातीपासून शुभ संकेत मिळतील. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कलाकार मंडळींचे कौतुक होईल. नोकरीत मोठी जबाबदारी राहील, त्यामुळे कामाचा ताण वाढेल. वेळेचे नियोजन व सहकारी वर्गाशी गोडीने बोलणे हे धोरण ठेवले तर यश मिळेल. धनलक्ष्मीची कृपा राहील, मात्र देवाणघेवाण करताना काळजी घ्या.

टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

♏ वृश्चिक रास

गोड शब्दात बोला: सुरुवातीला अचानक धनलाभ होऊ शकतो. मात्र, थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. वाहने जपून चालवा, सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील, लोकांना दुखवू नका. गोड शब्दात संभाषण करा, गरज नसताना स्पष्टवक्तेपणा दाखवणे महागात पडू शकते. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कामाचा ताण राहील, शनिवारी अनुकूलता अनुभवायला मिळेल. धनलाभ होईल, महत्त्वाचे काम होईल. काळजी दूर होईल.

टीप: मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार चांगले दिवस.

♐ धनु रास

प्रेम सफल होईल: प्रेम प्रकरणात सफलता मिळेल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील, मनात कल्पक विचार राहतील. मात्र मंगळवार, बुधवार थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा, अफाट साहस करण्याचा अंदाज पडू नका. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, महत्त्वाच्या कामात अडथळा येईल. गुरुवारपासून परिस्थिती नियंत्रणात येईल, प्रलंबित कामे मार्गी लागतील. काहींना प्रवास घडून येईल. सामाजिक कार्यात सहभाग राहील, शनिवारी नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल.

टीप: रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

♑ मकर रास

संमिश्र ग्रहमान राहील: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. महत्त्वाच्या कामात अडथळा येईल, विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, कामात अनपेक्षित बदल होऊ शकतात. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. जोडीदाराशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. गुरुवार, शुक्रवार सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या प्रश्नांची काळजी करू नका. शनिवारपासून परिस्थितीवर नियंत्रण मिळेल.

टीप: मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

♒ कुंभ रास

कामाची घाई नको: घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. थोडे संयम व सावधपणाने वागण्याची गरज आहे. सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. एखादी चांगली बातमी कळेल. मात्र, मंगळवार, बुधवार काही अडचणी असतील. तुमच्या योजना गुप्त ठेवा. आरोग्याची काळजी घ्या, कामातील बदलामुळे तुम्हाला दगदग होईल. इतरांच्या भानगडीत पडू नका, वादविवादात पडू नका. गुरुवार, शुक्रवार चांगले अनुभव येतील. जोडीदाराचे सहकार्य राहील. शनिवारी वाहन जपून चालवा, महत्त्वाची कामे पुढे ढकला.

टीप: रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

♓ मीन रास

पूर्वार्ध अनुकूल राहील: पूर्वार्धात ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. महत्त्वाची कामे झटपट आटोपून घ्या. सुरुवातीला घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, जवळच्या लोकांच्या सहवासात मन आनंदी राहील. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल, पगारवाढ व तत्सम लाभ होतील. मंगळवार, बुधवार प्रवासात सतर्क रहा, मुलांची काळजी घ्या, त्यांच्याशी संवाद ठेवा. बुधवार, गुरुवार आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, शनिवारी प्रलंबित कामे आटोप्यात येतील, प्रेमात यश मिळेल.

टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या