WWW.SWAMIMARG.ONLINE
दैनिक राशीभविष्य: २५ मे २०२६
॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ ॐ नमः शिवाय ॥
♈ मेष
आज सप्ताहाची सुरुवात संमिश्र स्वरूपाची राहील. व्यावसायिक करारांमध्ये यश मिळेल, मात्र मोठे व्यवहार करताना पूर्वार्धात सावधानता बाळगा. कुणीतरी तुमच्या विरोधात गुप्त कारवाया करण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात प्रगती होईल.
♉ वृषभ
आजचा सोमवार तुम्हाला अतिशय अनुकूल वातावरणाचा अनुभव देईल. आर्थिक आवक उत्तम राहील. नोकरीच्या ठिकाणी एखादी नवीन व मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल.
♊ मिथुन
आज चंद्र भ्रमणाची उत्तम अनुकूल फळे मिळतील. समाजातील थोरमोठ्या व्यक्तींच्या सहवासात येण्याचे योग आहेत. जुन्या ओळखीचा व्यवसायात चांगला फायदा होईल, मात्र भावंडांशी गैरसमज टाळा.
♋ कर्क
चंद्राचे धनस्थानातील भ्रमण आज तुमच्या प्रपंचात अनुकूल वातावरण ठेवीत. अडकलेला पैसा परत मिळण्याचे योग आहेत. नोकरीत नवीन आणि मोठी संधी मिळण्याची शक्यता असून अधिकारी वर्गाचे पूर्ण सहकार्य लाभेल.
♌ सिंह
मनात आज प्रचंड सकारात्मक विचार राहतील. अडकलेले पैसे वसूल होण्यासाठी तुम्ही न भिता केलेले प्रयत्न आज शंभर टक्के यशस्वी ठरतील. वडीलधाऱ्या मंडळींकडून योग्य ते मार्गदर्शन आणि पाठबळ लाभेल.
♍ कन्या
सुरुवातीला थोडी धावपळ किंवा दगदग जाणवू शकते, पण दुपारनंतर तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. नोकरीमध्ये चांगल्या सोयी-सुविधा मिळतील. हाती घेतलेले कठीण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल.
♎ तूळ
आज पूर्वार्धात संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. पैसा चांगला मिळेल, पण तो धार्मिक किंवा सामाजिक कार्यात खर्चही होईल. लोकांशी व्यवहार करताना थोडे सावध राहा, कोणी चुकीचा सल्ला देऊ शकते.
♏ वृश्चिक
आज तुम्ही ठरवलेली कामे अतिशय सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण अतिशय उत्तम राहील. महत्त्वाच्या भेटीगाठी यशस्वी ठरतील. नोकरीत नवीन जबाबदारी मुत्सद्दीपणाने हाताळा.
♐ धनु
आज नोकरीमध्ये नवीन आणि चांगली संधी मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे वेळापत्रक व्यस्त होईल. काही लोक कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील.
♑ मकर
चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण आज तुम्हाला विविध क्षेत्रात अतिशय चांगले आणि सुखाचे अनुभव देईल. काही योगायोगाच्या चांगल्या घटना घडतील. समाजात मान वाढेल आणि धनलक्ष्मीची पूर्ण कृपा राहील.
♒ कुंभ
आज पूर्वार्धात मनामध्ये काहीसे काळजीचे विचार राहू शकतात. जोडीदाराशी संवाद साधताना गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. वाहनाच्या वेगावर पूर्ण नियंत्रण ठेवा, उत्तरार्ध बरा राहील.
♓ मीन
आज संमिश्र स्वरूपाचा दिवस आहे. नवीन जबाबदारीत गुंतलेले राहाल, ज्यामुळे दगदग होईल. लोकांकडून अपेक्षेभंग टाळण्यासाठी स्वतःच्या कामावर विसंबून राहा. व्यवसायात अंदाज बरोबर ठरतील.


0 टिप्पण्या