⚖️ साप्ताहिक राशीभविष्य — २४ मे ते ३० मे २०२६ 📿

साप्ताहिक राशीभविष्य — २४ मे ते ३० मे २०२६ | स्वामी मार्ग

WWW.SWAMIMARG.ONLINE

साप्ताहिक राशीभविष्य: २४ मे ते ३० मे २०२६

॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ ग्रहांचे शुभ परिवर्तन ॥

विशेष: या सप्ताहाच्या अखेरच्या टप्प्यात बुध ग्रहाचा मिथुन राशीत प्रवेश होत आहे!
नमस्कार स्वामी भक्तांनो! २४ मे ते ३० मे २०२६ या सप्ताहाच्या अखेरच्या टप्प्यात बुध ग्रहाचा मिथुन राशीत प्रवेश होईल. अन्य कुठलाही मोठा ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी—मंगळ मेष राशीत, रवी आणि हर्षल बुध वृषभ राशीत, गुरू आणि शुक्र मिथुन राशीत असून दि. २९ रोजी बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. केतू सिंह राशीत, प्लूटो मकर राशीत, तर राहू कुंभ राशीत आहे. शनी आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण या सप्ताहात प्रामुख्याने सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक या राशींमधून राहील. या ग्रहस्थितीचा तुमच्या राशीवर काय प्रभाव पडेल, ते सविस्तर खालीलप्रमाणे वाचा:

♈ मेष (Aries)

ओळखीचे फायदे होतील: हा सप्ताह तुम्हाला संमिश्र ग्रहमानाचा अनुभव देणारा ठरेल. व्यावसायिक करारांमध्ये यश मिळेल. व्यावहारिक चातुर्य वापरण्याची गरज पडेल. पूर्वार्धात मोठे व्यवहार करताना सावध राहा, कुणी तुमच्या विरोधात गुप्तपणे कारवाया करेल. तब्येतीची काळजी घ्या. गुरुवार, शुक्रवार चांगले अनुभव देतील. विवाह जुळण्याच्या दृष्टीने हालचाली वेग घेतील. नवीन ओळखीचे फायदे होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. शनिवारी प्रवासात सतर्क राहा, वाहन हळू चालवा.

चांगले दिवस: रविवार, गुरुवार, शुक्रवार

♉ वृषभ (Taurus)

नवी जबाबदारी मिळेल: गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस वगळता बाकीचा काळ तुम्हाला अनुकूल वातावरणाचा राहील. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे, परीक्षेचे निकाल मनासारखे लागतील. गुरुवार, शुक्रवार तब्येतीची काळजी घ्या. शनिवारी अनेक अडचणी दूर होतील. मात्र, मोहापासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे. जोडीदाराशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या.

चांगले दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार

♊ मिथुन (Gemini)

सतत प्रवास होईल: चंद्र भ्रमणाची अनुकूल फळे मिळतील. थोरमोठ्यांच्या सहवासात याल. ओळखीचा फायदा होईल. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. काहींना सतत प्रवास करावा लागेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल, त्यामुळे काम वाढेल. सकारात्मक पद्धतीने विचार केला, तर काही अडचण जाणवणार नाही. नवीन उपक्रमात सहभागी व्हाल, त्यात उत्साह राहील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. शनिवारी प्रवासात काळजी घ्या. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा.

चांगले दिवस: मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार

♋ कर्क (Cancer)

तुमचे महत्त्व वाढेल: चंद्राचे धनस्थानापासून ते पंचम स्थानापर्यंत होणारे भ्रमण अनुकूल वातावरण ठेवील. पैसा मिळेल. मात्र, चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळच्या प्रवासाचा योग येईल. नोकरीत नवीन संधी मिळेल, त्यामुळे तुमचे महत्त्व वाढेल. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. मुलांची प्रगती होईल. सामाजिक मानसन्मान मिळेल.

चांगले दिवस: मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार

♌ सिंह (Leo)

नवीन संधी मिळेल: अडचणी दूर होऊन नवीन संधीचा फायदा घेण्यासाठी प्रयत्नशील राहाल. सप्ताहाच्या सुरुवातीला रविवार वगळता इतर काळात मनात सकारात्मक विचार राहतील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. अडकलेले पैसे वसूल होतील. मात्र, त्यासाठी तुम्ही कुठलीही भीड न बाळगता प्रयत्न केले पाहिजेत. वडीलधाऱ्या मंडळींकडून मार्गदर्शन मिळेल. आवडीच्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. भावंडांशी सख्य राहील. जवळच्या प्रवासाचा योग येईल. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्या.

चांगले दिवस: रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार

♍ कन्या (Virgo)

सफलता मिळेल: सप्ताहाची सुरुवात थोडी दगदगीने होईल. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहाल. मात्र, तुमच्या कामाची लोकांना कदर वाटणार नाही. सोमवारपासून तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. नोकरीत सोयी-सुविधा मिळतील. हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने गुरुवार, शुक्रवार खूप अनुकूल काळ राहील. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील.

चांगले दिवस: मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार

♎ तूळ (Libra)

विवाह जुळतील: पूर्वार्धात संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. पैसा मिळेल आणि तो खर्चही होईल. लोकांच्या भेटीगाठी होतील. मात्र, त्यांच्याशी व्यवहार करताना थोडे सावध राहा. काही लोक तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेतील. काहींना पूर्वार्धात प्रवास घडून येईल. गुरुवारपासून परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. अडचणी दूर होतील, त्यामुळे तुम्हाला हलके हलके वाटेल. जोडीदाराशी सूर जुळतील. विवाहोत्सुकांना चांगला काळ राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. वडीलधाऱ्या मंडळींकडून मार्गदर्शन मिळेल.

चांगले दिवस: रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार

♏ वृश्चिक (Scorpio)

कामे होतील: सप्ताहाची सुरुवात थोडी दगदगीने होईल. एखाद्या कामात व्यस्त राहाल. नवीन जबाबदारी आल्याने मुत्सद्दीपणाने हाताळावी लागेल. सोमवार, मंगळवार, बुधवार आपण ठरवलेली कामे सोप्या पद्धतीने पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. भेटीगाठी फलद्रूप होतील. गुरुवार, शुक्रवार मात्र कायद्याची बंधने पाळा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. लोकांना आश्वासने देऊ नका. शनिवारी प्रेमात सावध राहावे.

चांगले दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार

♐ धनु (Sagittarius)

चांगली बातमी कळेल: शनिवारवगळता बाकीच्या काळात तुम्हाला अनुकूल वातावरण राहील. सुरुवातीला एखादी चांगली बातमी कळेल. काहींना सामाजिक कार्य आणि जबाबदारी राहील. मात्र, काही लोक त्यात अडथळा आणून बदनामी करण्याचा प्रयत्न करतील. नोकरीत नवीन संधी मिळेल, त्यामुळे सोमवारपासून तुमचे वेळापत्रक व्यस्त होऊन जाईल. घरगुती जबाबदाऱ्यांचा ताण राहील. गुरुवार, शुक्रवार चांगले अनुभव देतील. कामाचा ताण कमी होईल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ राहील.

चांगले दिवस: सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार

♑ मकर (Capricorn)

महत्त्वाचा निर्णय येईल: सप्ताहाची सुरुवात म्हणजे रविवार वगळता इतर काळात तुम्हाला चांगले अनुभव येतील. रविवारी वाहन जपून चालवा. सोमवारपासून चंद्राचे भाग्यस्थानापासून ते लाभ स्थानापर्यंत होणारे भ्रमण तुम्हाला लाभदायक ठरेल. काही योगायोगाच्या घटना घडतील. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. समाजात तुमचा मान वाढेल. पुरस्कार जाहीर होईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. धनलक्ष्मीची कृपा राहील. नातेवाईकांशी भेटी होतील.

चांगले दिवस: सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार

♒ कुंभ (Aquarius)

उत्तरार्धात यश मिळेल: पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध तुम्हाला अनुकूल फळे मिळवून देईल. सुरुवातीला तुमच्या मनात काळजीचे विचार असतील. जोडीदाराशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. बुधवारपर्यंत वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या कामात घाई करू नका, नाहीतर तुमच्या हातून नकळत चुका होऊ शकतात. गुरुवारपासून तुमच्या अडचणी दूर होतील. आनंदाची बातमी मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. मनावरील ताण निघून जाईल. शनिवारी नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल.

चांगले दिवस: गुरुवार, शुक्रवार, शनिवार

♓ मीन (Pisces)

मौजमजा कराल: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. सुरुवातीला एखाद्या नवीन जबाबदारीत गुंतलेले राहाल. लोकांकडून अपेक्षेभंग होऊ शकतो. सोमवारपासून परिस्थिती आटोक्यात येईल. अडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. गुरुवार, शुक्रवार शांतचित्ताने कामे करा. वाहन जपून चालवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. शनिवारी मुलांची प्रगती कळेल.

चांगले दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या