WWW.SWAMIMARG.ONLINE
दैनिक राशीभविष्य: १५ जून २०२६
॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ पावन सोमवती अमावस्या विशेष ॥
♈ मेष रास
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत प्रगतीचा आणि सुखाचा ठरेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मौजमजा आणि विरंगुळ्यासाठी उत्तम वेळ मिळेल. धनलक्ष्मीची तुमच्यावर पूर्ण कृपा राहील. वडीलधाऱ्या मंडळींकडून मोठे आशीर्वाद लाभतील. मात्र, आजच्या दिवशी कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक घाईगडबडीत न करता अत्यंत जपून करणे हिताचे ठरेल.
♉ वृषभ रास
आज चंद्र तुमच्याच राशीत संचार करत आहे. प्रदीर्घ काळापासून सतावत असलेल्या अनेक अडचणी दूर झाल्यामुळे आज मनावरील मोठे दडपण निघून जाईल आणि हलके हलके वाटेल. धनलक्ष्मीची पूर्ण कृपा राहील आणि आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. व्यवसायात मोठी भरभराट होईल आणि भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल.
♊ मिथुन रास
आज सप्ताहाच्या सुरुवातीला प्रपंचात आणि मनात अत्यंत अनुकूल वातावरण अनुभवायला मिळेल. जुन्या अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. प्रलंबित कामे वेगाने पुढे सरकतील. व्यवसायात यश मिळेल. आज तुम्हाला काही सुखद आणि चांगले अनुभव येतील. खाण्यापिण्याची उत्तम चंगळ राहील आणि धनलक्ष्मीची पूर्ण कृपा राहील.
♋ कर्क रास
आज प्रपंचात आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी अत्यंत चांगली बातमी समजेल, विविध मार्गांनी आर्थिक लाभ होतील. जुन्या व्यवहारांमधून मोठा अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दुपारनंतर अनावश्यक खर्चावर कडक नियंत्रण ठेवा. कायद्याचे नियम पाळा आणि हायगय करू नका.
♌ सिंह रास
आजचा सोमवार तुम्हाला नोकरी आणि करिअरमध्ये नवीन सुवर्णसंधी देणारा ठरेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण अतिशय उत्तम राहील, अनपेक्षित काही भेटवस्तू प्राप्त होतील. समाजात तुमचा मान आणि जनसंपर्क वाढेल. लोक तुमच्या मताचा आदर करतील. कोर्टाचे किंवा जमिनीचे जुने वाद आज मिटण्याची शक्यता आहे.
♍ कन्या रास
आज प्रपंचात आणि कार्यक्षेत्रात तुम्हाला अनपेक्षित मोठे यश किंवा शुभ वर्तमान समजेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी लाभेल, लोक तुम्हाला मान देतील. पर्यटनाच्या निमित्ताने कुटुंबासोबत फिरणे होईल. नोकरीमध्ये अतिशय चांगली परिस्थिती निर्माण होईल, सोयी-सुविधा वाढतील.
♎ तूळ रास
आज दिवसाच्या सुरुवातीला मनात काही लहान अडचणी किंवा चिंता असू शकतात, त्यामुळे रागावर पूर्ण ताबा ठेवला पाहिजे. आजचा पावन सोमवार आपल्या मनात पूर्ण संयम बाळगण्याचा सल्ला देत आहे. वाहन अत्यंत जपून चालवा, घाई टाळा. दुपारनंतर नशिबाची साथ मिळून अचानक धनलाभ होईल.
♏ वृश्चिक रास
आज दिवसाची सुरुवात कमालीच्या उत्साहात आणि आनंदाने होईल. परंतु, गरजेपेक्षा जास्त आत्मविश्वास बाळगणे आज नुकसान करू शकते. काही लोक तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे अत्यंत सावध राहा. वाहन चालवताना वेगावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
♐ धनु रास
आज चंद्राचे भ्रमण तुमच्या राशीला संमिश्र फळे देणारे ठरेल. प्रपंचात आज विनाकारण फार दगदग किंवा धावपळ करू नका. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. प्रवासादरम्यान अत्यंत सतर्क राहा, मौल्यवान वस्तू आणि कायदेशीर कागदपत्रे सांभाळा. व्यवसायात मात्र आज अनुकूलता राहील.
♑ मकर रास
आज सप्ताहाची सुरुवात अतिशय उत्साहवर्धक होईल. एखादी आनंद वाढवणारी महत्त्वाची घटना घडेल, ज्यामुळे आजचा सोमवार खूप सुखाचा ठरेल. मात्र, कार्यक्षेत्रात किंवा प्रप्रंचातील तुमची अत्यंत गोपनीय माहिती आज कोणासही सांगू नका. काही लोक कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात.
♒ कुंभ रास
आज नोकरीच्या ठिकाणी नवीन प्रकल्पाचे नेतृत्व करण्यासाठी तुमच्या नावाचा प्राधान्याने विचार केला जाईल, ज्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. पगारवाढ व इतर चांगल्या सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील आणि पाहुण्यांचे आगमन होईल. प्रवास आनंदाचा ठरेल.
♓ मीन रास
व्यावसायिक दृष्ट्या आजचा सोमवार अत्यंत उत्तम राहील, व्यापारात केलेले नवीन प्रयोग यशस्वी ठरतील. ग्राहकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम राहील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळाल्यामुळे कामाचा ताण वाढेल, परंतु त्यातून मोठे आर्थिक फायदे देखील भविष्यात तुम्हाला नक्कीच मिळतील.


0 टिप्पण्या