WWW.SWAMIMARG.ONLINE
साप्ताहिक राशीभविष्य: १४ जून ते २० जून २०२६
॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ सोमवती अमावस्या आणि विनायक चतुर्थी विशेष ॥
♈ मेष (Aries)
चांगल्या बातम्या मिळतील: चंद्राचे भ्रमण धनस्थानापासून ते पंचम स्थानापर्यंत आहे. या काळात तुम्हाला अनेक आघाड्यांवर यश मिळेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. भावंडांच्या भेटी होतील. व्यवसायात भरभराट होईल. सोमवार, मंगळवार आर्थिक गुंतवणूक जपून करा. गुरू, शुक्र, चंद्र युतीमुळे घराचे स्वप्न पूर्ण होईल.
♉ वृषभ (Taurus)
मोहापासून दूर रहा: अनेक अडचणी दूर झाल्यामुळे तुम्हाला हलके हलके वाटेल. मात्र, प्रेमात असणाऱ्यांनी थोडे सावध राहावे. सुरुवातीला मोहापासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे. जीवनशातीशी गैरसमज होतील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील, आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. गुरू, शुक्र युतीला चंद्राचे पाठबळ मिळाल्याने व्यवसायात भरभराट होईल. भावंडांशी सख्य राहील. त्यांच्यासमवेत विरंगुळ्याचे क्षण अनुभवायला मिळतील. मात्र, आर्थिक गुंतवणूक करताना घाई करू नका.
♊ मिथुन (Gemini)
धनलक्ष्मीची कृपा राहील: या सप्ताहात रविवार वगळता, बाकीच्या काळात तुम्हाला अनुकूल वातावरण राहील. रविवारी आपण संयमाने वागण्याची गरज आहे, घाईघाईत निर्णय घेऊ नका. कायद्याची बंधने पाळण्यात हायगय करू नका. सोमवारपासून परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बुधवार, गुरुवार चांगले अनुभव येतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील, धनलक्ष्मीची कृपा राहील.
♋ कर्क (Cancer)
विवाह ठरेल: सोमवार, मंगळवार या काळात आपण महत्त्वाची कामे करून टाका. सुरुवातीला रविवारी एखादी चांगली बातमी कळेल, विविध प्रकारचे लाभ होतील. एखाद्या व्यवहारात तुमचा फायदा होईल, अनपेक्षित लाभ होतील. सोमवार, मंगळवार मात्र फार दगदग करू नका, खर्चावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने पाळण्यात हायगय करू नका. बुधवारपासून चांगला काळ सुरू होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. ओळखीचे फायदे होतील. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येतील.
♌ सिंह (Leo)
नवी संधी मिळेल: सतत कार्यरत राहाल, नोकरीत नवीन संधी मिळेल, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. सोमवार, मंगळवार आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील, भेटवस्तू मिळतील. जनसंपर्क चांगला राहील. लोक तुम्हाला मान देतील. ओळखीचे फायदे होतील. बुधवार, गुरुवार मनात आध्यात्मिक विचार राहतील. फार मोठ्या उलाढाली या काळात करू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने पाळा, वाहने जपून चालवा. शुक्रवार, शनिवार अडचणी दूर होतील.
♍ कन्या (Virgo)
शुभ वर्तमान कळेल: सुरुवातीला अनपेक्षित यश मिळेल. शुभ वर्तमान कळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. लोक तुम्हाला मान देतील. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. काहींना पुरस्कार जाहीर होतील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा. बुधवार, गुरुवार धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. शुक्रवार, शनिवार सावध राहा.
♎ तूळ (Libra)
तुमचे महत्त्व वाढेल: सुरुवातीला काही अडचणी असतील, रागाला आवर घातला पाहिजे. रविवारी आपण संयमाने वागण्याची गरज आहे. वाहने जपून चालवा. कामांची घाई करू नका. काहींना अचानक धनलाभ होईल. सोमवारपासून परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. बुधवार, गुरुवार नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. तुमच्या योग्यतेची दखल घेतली जाईल. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात मंगलमय वातावरण राहील.
♏ वृश्चिक (Scorpio)
नशिबाचा कौल मिळेल: सुरुवात उत्साहात होईल. तरी गरजेपेक्षा जास्त आत्मविश्वास नको. कुणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करेल, त्या दृष्टीने रविवारी आपण संयमाने वागण्याची गरज आहे. सोमवार, मंगळवार वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. बुधवार, गुरुवार अनुकूलता राहील. कामे मार्गी लागतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. पर्यटनाचा आनंद लुूटाल. समाजात मान वाढेल, स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे.
♐ धनु (Sagittarius)
संमिश्र फळे मिळतील: चंद्राचे षष्ठ व सप्तम स्थानातून होणारे भ्रमण तुम्हाला संमिश्र स्वरूपाची फळे देईल. रविवारी आपण फार दगदग करू नका. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. प्रवासात सतर्क रहा. मूल्यवान वस्तू, कागदपत्रे सांभाळा. सोमवार, मंगळवार व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. आवडत्या व्यक्तीचा सहवास मिळेल. भेटवस्तू मिळतील. बुधवार, गुरुवार काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
♑ मकर (Capricorn)
विवाह ठरेल: सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. एखादी उत्साह वाढवणारी घटना घडेल, त्यामुळे रविवार आनंदाचा ठरेल. सोमवार, मंगळवार मात्र आपण आपल्या मनातली गोपनीय माहिती लोकांना सांगू नका. काही लोक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील, तब्येतीची काळजी घ्या. बुधवार, गुरुवार मन प्रसन्न राहील. विवाहोत्सुकांना अनुकूल फळे मिळतील. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही. शुक्रवार, शनिवार वाहने जपून चालवा.
♒ कुंभ (Aquarius)
नवीन संधी मिळेल: पूर्वार्धात अनुकूल वातावरण राहील, नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. पगारवाढ मिळेल. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घरी पाहुणे मंडळी येतील. काहींना प्रवास घडून येईल. मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्या कडून अपेक्षेचे ओझे वाढवू नका. बुधवार, गुरुवार आरोग्याची काळजी घ्या, विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील, फार दगदग होईल, अशी कामे करू नका. शुक्रवार, शनिवार अडचणी दूर होतील.
♓ मीन (Pisces)
सफलता मिळेल: व्यावसायिक दृष्ट्या हा आठवडा नवीन प्रयोग करून पाहिले पाहिजेत. ग्राहकांचा प्रतिसाद चांगला राहील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल, त्यामुळे तुम्हाला फायदे होतील; पण कामाचा ताण राहील. बुधवार, गुरुवार कामाचा ताण कमी होईल. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. समाजात तुमचा मान वाढेल. स्पर्धा परीक्षेचे निकाल मनासारखे लागतील. शुक्रवार, शनिवार थोडे सावधपणे वागा.


0 टिप्पण्या