📿 साप्ताहिक राशीभविष्य — २६ जुलै ते ०१ ऑगस्ट २०२६ ⚖️

साप्ताहिक राशीभविष्य — २६ जुलै ते ०१ ऑगस्ट २०२६ | स्वामी मार्ग
ज्योतिषविशारद: विजय देशपांडे

साप्ताहिक राशीभविष्य

॥ श्री स्वामी समर्थ ॥

दि. २६ जुलै ते १ ऑगस्ट २०२६

🌟 सप्ताहाची ग्रहस्थिती व विशेष पंचांग योग

या सप्ताहाच्या शेवटी शनिवारी शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल. अन्य कुठलेही ग्रहपालट नाहीत. ग्रहस्थिती अशी— मंगळ आणि हर्षल वृषभ राशीत, बुध मिथुन राशीत, रवी आणि गुरू कर्क राशीत, शुक्र आणि केतू सिंह राशीत आहेत. शनी आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. प्लुटो मकर राशीत, तर राहू कुंभ राशीत आहे.

चंद्राचे भ्रमण वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ राशीतून राहील. या सप्ताहात रविवारी प्रदोष, तर बुधवारी महापवित्र **गुरुपौर्णिमा** आहे. दि. ३१ रोजी सकाळी ६:३९ वाजेपासून **पंचक** सुरू होत आहे.

♈ मेष

सफलता मिळेल: तुमच्या सगळ्या अडचणी दूर होऊन सफलता देणारा हा सप्ताह ठरेल. सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. लोकांकडून तुम्हाला मानसन्मान मिळेल. नवनवीन उपक्रम हाती घेण्यात रस राहील. विवाह जुळण्याच्या दृष्टीने हालचाली वेग घेतील. काहींना पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मुलाखतीचे बोलावणे येईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.

टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

♉ वृषभ

संमिश्र ग्रहमान राहील: संमिश्र ग्रहांच्या अनुभवाचा अनुभव येईल. सुरुवातीला काही अडचणी असतील, त्यामुळे सावधपणे वागण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. बुधवारपासून अडचणी दूर होतील. समाजात तुमचा मान वाढेल. काहींना प्रवास घडून येतील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील.

टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

♊ मिथुन

भेटवस्तू मिळतील: बुधवार व गुरुवार हे दोन दिवस वगळता बाकीचा काळ तुम्हाला चांगले यश मिळेल. सुरुवातीला चांगल्या घटना घडतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. व्यवसायात भरभराट होईल. मनात नावीन्यपूर्ण कल्पना विकसित होतील. बुधवार, गुरुवार कामाचा ताण घेऊ नका. फार दगदग करू नका. वाहने जपून चालवा. शुक्रवार, शनिवार प्रवास होईल. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा.

टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, शुक्रवार चांगले दिवस.

♋ कर्क

योजना गुप्त ठेवा: साधक बाधक अनुभव येतील. सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याच्या किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी असतील. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आपल्या योजना गुप्त ठेवा. नोकरीत कामाचा बदल होईल. बुधवार, गुरुवार चांगले अनुभव येतील. जोडीदाराचा सल्ला घ्या. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. शुक्रवार, शनिवार महत्त्वाच्या कामात अडथळा येईल. कामाचा फार आग्रह नको. अचानक धनलाभ होईल. वाहने जपून चालवा.

टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

♌ सिंह

पूर्वार्ध अनुकूल राहील: सप्ताहाची सुरुवात चांगल्या घटनांनी होईल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. प्रवासाचे बेत ठरतील. सामाजिक मानसन्मान मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. अडून राहिलेली कामे हाती घेतील. तुमच्या उपक्रमांना योग्य ती प्रसिद्धी मिळेल. महत्त्वाची कामे सोप्या पद्धतीने पूर्ण होतील. बुधवार, गुरुवार आपण आरोग्याची काळजी घ्या. आपल्या योजना लोकांना सांगत बसू नका. शुक्रवारपासून अडचणी दूर होतील.

टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, शुक्रवार चांगले दिवस.

♍ कन्या

पदोन्नती, पगारवाढ मिळेल: पूर्वार्धात ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. महत्त्वाची कामे झटपट आटपून घ्या. नोकरीत चांगली परिस्थिती. तुमच्या योग्यतेची दखल घेतली जाईल. पदोन्नती, पगारवाढ अशी फळे मिळतील. काहींना नवीन जबाबदारी मिळेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. समाजात तुमचा मान वाढेल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. शुक्रवार, शनिवार दगदग होईल.

टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

♎ तूळ

विविध प्रकारचे लाभ होतील: धनलाभ, व्यावसायिक यश, कार्यक्षेत्रात सफलता, भेटीगाठी इत्यादी दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात भरभराट होईल. हसत खेळत राहाल. मात्र, फार मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. भावंडांच्या भेटीगाठी होतील. भेटवस्तू मिळतील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घरात खेळमेळीचे वातावरण राहील. गृहसजावटीकडे लक्ष द्याल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

♏ वृश्चिक

धनलक्ष्मीची कृपा राहील: चंद्राचे धनस्थानापासून ते चतुर्थ स्थानापर्यंत होणारे भ्रमण तुम्हाला चांगली फळे देईल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. वडिलांजोपार्जित संपत्तीची कामे होतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. महत्त्वाच्या कामात लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. वडिलांच्या मंडळींचे आशीर्वाद मिळतील. बुधवार, गुरुवार जवळील प्रवास होतील. आर्थिक गुंतवणुकीत खबरदारी घ्या. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमचा विचार केला जाईल. घरातील कामांसाठी वेळ द्यावा लागेल.

टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

♐ धनु

प्रेमात प्रतिसाद मिळेल: सप्ताहाची सुरुवात आनंदी घटनांनी होईल. अनेक उत्तम लाभ होतील. आवडत्या लोकांच्या सहवासात याल. मनावरील ताण निघून जाईल. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळतील. तुमचा सल्ला लोकांच्या फायद्याचा ठरेल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मालमत्तेची कामे होतील. शुक्रवार, शनिवार भावंडांशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रवासात सतर्क राहा. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्या.

टीप- रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

♑ मकर

विवाह ठरतील: सुरुवातीला तुमच्या समोर काही अडचणी असतील. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. प्रवासात सतर्क राहा. अवास्तव खर्चावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने पाळण्यात हलगर्जी करू नका. बुधवारपासून अडचणी दूर होतील. लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. विवाहोत्सुकांसाठी अनुकूल वातावरण राहील. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. व्यवसायात तेजीचा अनुभव येईल. मात्र, खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. शिळे व उघड्यावरील पदार्थ खाणे टाळा.

टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

♒ कुंभ

मोठी जबाबदारी राहील: साधकबाधक अनुभव येतील. एखाद्या उलाढालीत तुमचा मोठा फायदा होईल. त्या दृष्टीने सप्ताहाची सुरुवात महत्त्वाची ठरेल. विवाहोत्सुकांना अनुकूल वातावरण राहील. काहींना प्रवास घडून येतील. मनात आध्यात्मिक विचार राहतील. बुधवार, गुरुवार हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. नोकरीत मोठी जबाबदारी राहील. मात्र, कामाचा ताण असेल. दगदग होईल. नियमानुसार कामे करा. शुक्रवारपासून अडचणी दूर होतील.

टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, शुक्रवार चांगले दिवस.

♓ मीन

पूर्वार्ध अनुकूल राहील: पूर्वार्धात ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. त्यामुळे महत्त्वाची कामे आपण गुरुवारच्या आत आटोपून घ्या. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. अपेक्षित पद, बदली मिळू शकते. फारसे धावपळीचे व त्रासाचे काम नसेल. सुखसोयी वाढून मिळतील. घरात आनंदी वातावरण राहील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. भेटीगाठी फलद्रूप होतील. शुक्रवार, शनिवार संयमाची परीक्षा पाहिली जाईल. कायद्याची बंधने पाळा.

टीप- रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या